Sameer Amunekar
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळ मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर व समुद्रकिनाऱ्यालगत हा किल्ला वसलेला आहे. तो सुमारे ५० मीटर उंच भूशिरावर खाडीच्या मुखाजवळ बांधलेला आहे.
पूर्णगड गावातील महादेव मंदिराशेजारील पायवाटेने गडाकडे जाता येते. ही पायवाट ऐतिहासिक असून आजही वापरली जाते.
दरवाजाबाहेर हनुमानाचे मंदिर आहे. दरवाजा जांभा दगडात बांधलेला असून त्यावर चंद्र, सूर्य आणि गणेशाचे शिल्प कोरलेले आहे.
दरवाजाच्या आत दोन्ही बाजूंस देवड्या बांधलेल्या असून त्यामध्ये दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. एका देवडीत दगडी पात्र ठेवलेले आहे.
गड उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेला असून उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भागापेक्षा सुमारे ५ मीटरने उंच आहे.
मुख्य दरवाजाच्या कमानीतून आत गेल्यावर दुसरी कमान आहे, तिच्या आतील बाजूस फुलाचे शिल्प कोरलेले आहे. दरवाजाच्या आत दक्षिणेकडे एक समाधी आहे.
दरवाजाच्या उत्तरेकडील पायऱ्यांमार्गे तटबंदीवर जाता येते. तटबंदीवरून गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचता येते आणि तेथून संपूर्ण गडाचे दृश्य दिसते