Sameer Amunekar
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे, त्याची लांबी १८ फूटांपर्यंत जाऊ शकते. तर ब्लॅक मांबा तुलनेने लहान पण अतिशय चपळ असतो, त्याची लांबी साधारण ८ ते १० फूट असते.
ब्लॅक मांबाच्या विषात न्युरोटॉक्सिन असते जे काही मिनिटांत मनुष्याचा श्वास थांबवू शकते. किंग कोब्राचे विष थोडे कमी घातक असले तरी त्याचे प्रमाण जास्त असल्याने एका डंखात हत्तीही कोसळू शकतो.
ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात वेगवान साप मानला जातो. तो ताशी २० किमी वेगाने सरपटू शकतो. तर किंग कोब्रा तुलनेने शांत आणि संयमी असतो.
ब्लॅक मांबा अत्यंत आक्रमक आणि हल्लेखोर स्वभावाचा असतो, तो वारंवार डंख मारतो. किंग कोब्रा मात्र आपला प्रदेश वाचवण्यासाठीच हल्ला करतो, अन्यथा शक्यतो पळ काढतो.
किंग कोब्रा इतर सापांवरच उपजीविका करतो, अगदी विषारी सापांनाही खातो. ब्लॅक मांबा मात्र उंदीर, पक्षी आणि लहान सस्तन प्राणी खातो.
ब्लॅक मांबा आफ्रिकेत आढळतो, तर किंग कोब्रा भारत, आग्नेय आशिया आणि चीनच्या जंगलांमध्ये आढळतो.
ब्लॅक मांबा विषारी आणि वेगवान असला तरी किंग कोब्रा हा सापांचा खरा राजा मानला जातो. त्याच्या आकार, बुद्धिमत्ता आणि इतर सापांना शिकार करण्याच्या क्षमतेमुळे.