Sameer Amunekar
मांडवी बीचला 'रत्नागिरीची चौपाटी' म्हणून ओळखले जाते. शहरातील हे सर्वात मुख्य आणि पर्यटकांचे आवडते फिरण्याचे ठिकाण आहे.
या किनाऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील काळी वाळू. महाराष्ट्रातील इतर अनेक बीचेसवर पांढरी वाळू दिसते, मात्र येथील काळी वाळू याला वेगळी ओळख देते.
या किनाऱ्यावरून समुद्रात दिमाखात उभा असलेला ऐतिहासिक रत्नादुर्ग किल्ला स्पष्ट दिसतो. हे दृश्य पर्यटकांना इतिहासाची आठवण करून देते.
सायंकाळच्या वेळी अथांग समुद्र आणि किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणारा सूर्यास्त अतिशय विलोभनीय दिसतो. फोटोग्राफी प्रेमींसाठी हे नंदनवन आहे.
मांडवी बीचवर पर्यटकांसाठी विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. बनाना राईड, जेट स्की आणि बोटिंगचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
चौपाटीवर अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. येथे तुम्ही कोकणी चाट, भजी आणि खास 'रत्नागिरीचा हापूस' पासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
रत्नागिरी बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनपासून मांडवी बीच अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे पोहोचणे अत्यंत सोपे आहे.