Glowing Skin: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर लावा 'या' गोष्टी; सकाळी चेहरा गुलाबासारखा चमकेल!

Sameer Amunekar

कच्च्या दुधाचा मसाज

रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर थोडे कच्चे दूध लावा. दूध नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेवरील घाण निघून जाते आणि सकाळी चेहरा अधिक उजळ व कोमल दिसतो.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

कोरफड जेल

कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन-ई असते. रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफड जेलने हलका मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि सकाळी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

गुलाबाचे पाणी

रात्री चेहरा स्वच्छ धुल्यानंतर त्यावर गुलाब पाणी स्प्रे करा. हे त्वचेचा पीच (pH) स्तर संतुलित ठेवते आणि थकलेल्या त्वचेला ताजेतवाने करते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा गुलाबासारखा टवटवीत दिसतो.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

बदाम तेल किंवा व्हिटॅमिन-ई ऑईल

जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर बदामाच्या तेलाचे २ थेंब चेहऱ्यावर लावा. हे तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि डार्क सर्कल्स किंवा डाग कमी करण्यास मदत करते.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

मधाचा वापर

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला थोडे मध लावून १० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

पुरेशी झोप आहे आवश्यक

केवळ बाह्य उपाय करून चालत नाही, तर रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण झाल्यावर त्वचा स्वतःला 'रिपेअर' करते, ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर फ्रेशनेस दिसतो.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

चेहरा धुणे विसरू नका

काहीही लावण्यापूर्वी चेहरा माइल्ड फेसवॉशने स्वच्छ धुवा. दिवसभरातील धूळ आणि प्रदूषण साफ झाल्याशिवाय लावलेले उपाय त्वचेवर नीट काम करत नाहीत.

Night skincare routine for glowing skin | Dainik Gomantak

रोमँटिक डेटसाठी कोकणातील 'हे' बीच आहे बेस्ट

Best beaches for couples in Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा