Sameer Amunekar
1890 साली Edward Torrens यांनी काढलेला हा फोटो मुंबईतील दैनंदिन श्रमजीवन दाखवतो. घरातील कामासाठी तयार केल्या जाणाऱ्या गोवऱ्या वाहणाऱ्या महिलांना कॅमेऱ्यासाठी बाहेर मांडण्यात आले होते.
1890 मधील हा फोटो Felice Beato यांनी काढलेला मानला जातो. प्रदर्शनातील फोटोंमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. लोकसमूहशास्त्रीय (ethnographic) दृष्टी आणि औपचारिक भव्यता यांचा संगम येथे दिसतो.
1862 मधील हा फोटो Charles Shepherd यांनी काढला. ब्रिटिशांनी ‘अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे’ असे वर्णन केलेल्या पठाण जमातीचे पुरुष अफगाण सीमेवर दिसतात. हा फोटो ब्रिटिश साम्राज्याच्या सीमाभागातील राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टीकोन दाखवतो.
स्त्यावरील व्यवहार आणि दैनंदिन कामकाज टिपण्याची परंपरा या फोटोत दिसते. सामान्य कामगार ‘अभ्यासाचा विषय’ बनताना दिसतात. समाजरचनेतील व्यवसायाधिष्ठित ओळखींचे दृश्य दस्तऐवजीकरण येथे आढळते.
William Johnson यांनी 1857 च्या The Indian Amateurs Photographic Album मध्ये हा फोटो प्रसिद्ध केला. महिलांना तरुण, बुद्धिमान असे संबोधून त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख केला आहे.
पारशी लोकांचा गट वसाहतकालीन बंगल्यासमोर बसलेला दिसतो. पोशाख, बसण्याची पद्धत आणि वास्तुकला यांतून त्यांची वेगळी ओळख प्रकर्षाने जाणवते.