Kokan Tourist Places: कोकणवारीचा बेत आखताय? मग 'या' 7 निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिल्याशिवाय तुमची ट्रीप अपूर्णच

Sameer Amunekar

गणपतीपुळे

स्वयंभू गणपतीचे मंदिर आणि त्याला लागूनच असलेला स्वच्छ, पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा हे इथलं मुख्य आकर्षण आहे. आध्यात्मिक शांतता आणि निसर्गसौंदर्याचा हा एक उत्तम संगम आहे.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

तारकर्ली आणि मालवण

जर तुम्हाला 'स्कुबा डायव्हिंग' किंवा 'स्नॉर्कलिंग'ची आवड असेल, तर तारकर्लीला पर्याय नाही. इथले पारदर्शक पाणी आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

अलिबाग आणि मुरुड-जंजिरा

मुंबई-पुण्यापासून जवळ असलेले हे लोकप्रिय ठिकाण आहे. मुरुडचा जंजिरा किल्ला हा पाण्यातला अभेद्य किल्ला पाहण्यासारखा आहे, तर अलिबागचे किनारे 'वन डे ट्रिप'साठी बेस्ट आहेत.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

दापोली

याला 'कोकणचे महाबळेश्वर' म्हटले जाते. येथील थंड हवामान, कर्दे आणि लाडघर सारखे समुद्रकिनारे, तसेच ऐतिहासिक 'कनकदुर्ग' आणि 'सुवर्णदुर्ग' किल्ले पाहण्यासारखे आहेत.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

वेंगुर्ला

गर्दीपासून दूर आणि शांतता हवी असेल, तर वेंगुर्ल्याचे सागरेश्वर आणि मोचेमाड किनारे अतिशय सुंदर आहेत. येथील डच वखार आणि शिरोडा बीच देखील प्रसिद्ध आहेत.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

गुहागर

शहराच्या कोलाहलापासून दूर, निवांत घालवण्यासाठी गुहागरचा समुद्रकिनारा उत्तम आहे. येथील व्याडेश्वर मंदिर आणि जवळच असलेला 'अंजनवेल'चा दीपगृह आवर्जून पाहावा.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

विजयदुर्ग आणि देवगड

इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी विजयदुर्ग किल्ला म्हणजे पर्वणीच! तसेच, देवगडचा हापूस आंबा आणि तिथले पवनचक्की उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरते.

Kokan Tourist Places | Dainik Gomantak

फेशियलचा ग्लो घरीच मिळवा! 'हा' पांढरा पदार्थ चेहऱ्यावर लावा

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा