Akshata Chhatre
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या चाहत्यांची एक अनोखी कहाणी समोर आली आहे. एका चाहतीने त्याच्या घराच्या दारात चक्क लग्नविधी केला होता.
रणबीर कपूरच्या घराच्या गेटवर एक महिला पंडित घेऊन आली. तिने रणबीरच्या नावाने कुंकू लावलं, फुले वाहिली आणि लग्नविधीसारखाच काहीतरी विधी केला.
रणबीरने सांगितलं, "मी शहराबाहेर होतो, पण वॉचमनने मला हे सगळं सांगितलं. हे ऐकून मी एकदम चक्रावून गेलो."
रणबीर पुढे म्हणाला, "मी माझ्या पहिल्या पत्नीला अजून भेटलो नाही. मला तिला कधीतरी नक्की भेटायची उत्सुकता आहे."
रणबीर कपूरच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याची लोकप्रियता खूप जास्त आहे. चाहत्यांची अशी अनोखी प्रेमळता पाहून तोही थक्क झाला.
बॉलिवूड कलाकारांवर चाहते खूप प्रेम करतात. आणि या घटनेने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.