Akshata Chhatre
भाताचं पाणी हे प्राचीन काळापासून सुंदर त्वचा आणि मजबूत केसांसाठी वापरलं जात आहे. चला, घरच्या घरी ते कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया!
१ कप तांदूळ, २ कप पाणी, एका स्वच्छ भांड्यात हे साहित्य तयार ठेवा.
तांदूळ धुवून घ्या. २ कप पाणी त्यात घालून ३० मिनिटं भिजू द्या. नंतर ते पाणी गाळून घ्या – हेच भाताचं पाणी तयार आहे!
तांदूळ आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. १०-१५ मिनिटे उकळा. पाणी गाळून घ्या आणि थंड होऊ द्या.
केस गुळगुळीत आणि मजबूत बनवते. टाळूतील जळजळ आणि कोंडा कमी होतो.
त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी होतात.