Sameer Amunekar
नाशिकजवळील रामशेज किल्ला लहान असला तरी त्याचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे.
संभाजी महाराजांच्या काळात रामशेज हा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी साडे पाच वर्षे सातत्याने लढाई केली.
या किल्ल्याच्या पराक्रमाचे वर्णन मोगलांच्या कागदपत्रांमध्ये सुवर्णाक्षराने नोंदले आहे, परंतु किल्लेदाराचे नाव इतिहासाला अज्ञात आहे.
रामशेज किल्ला नाशिकजवळ असल्यामुळे एका दिवसात किल्ला आणि जवळच्या चामर लेणी पाहून येणे शक्य आहे.
“रामशेज” म्हणजे रामाची शय्या. श्रीराम वनवासात असताना या डोंगरावर मुक्काम केल्यामुळे हे नाव ठेवलं गेलं.
औरंगजेबाने नाशिक प्रांतावर नियंत्रण मिळवण्यासाठी ४० हजार सैनिक आणि तोफखाना पाठवला, तर किल्ल्यावर केवळ ६०० मावळे होते.
मावळ्यांनी गडावर दगडांचा प्रचंड मारा करून मोगलांना परतण्यास भाग पाडले, ज्यामुळे छोट्या संख्येनेदेखील त्यांनी मोठा पराक्रम केला.