Ramshej Fort: जेव्हा युद्ध हरले, तेव्हा औरंगजेबाने मांत्रिक आणला! मराठ्यांनी सोन्याच्या रथासह मांत्रिकाला उडवलं; वाचा दुर्गराज 'रामशेज'ची थरारक कहाणी

Manish Jadhav

नावामागील पौराणिक इतिहास

प्रभू रामचंद्र वनवासात असताना काही काळ या किल्ल्याच्या परिसरात वास्तव्यास होते. जिथे प्रभू राम विश्रांती घेत असत (राम-शेज म्हणजे रामाची गादी/बेड), त्यावरुन या किल्ल्याला 'रामशेज' हे नाव पडले, अशी मान्यता आहे.

Ramshej Fort | Dainik Gomantak

6 वर्षे चाललेला ऐतिहासिक लढा

मराठ्यांच्या इतिहासात रामशेज किल्ल्याचा लढा सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, मुघल सम्राट औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी मोठी फौज पाठवली. पण मराठ्यांनी सलग 6 वर्षे हा किल्ला लढवला आणि मुघलांना नमवले.

Ramshej Fort | Dainik Gomantak

किल्लेदार सूर्याजी जेधेंचा पराक्रम

जेव्हा मुघल सेनापती शहाबुद्दीन खान (गाजीउद्दीन फिरोज जंग) याने मोठ्या सैन्यासह किल्ल्याला वेढा घातला, तेव्हा रामशेजचे किल्लेदार सूर्याजी जेधे यांनी केवळ काहीशे मावळ्यांच्या मदतीने मुघलांचे सर्व हल्ले अपयशी ठरवले.

Ramshej Fort | Dainik Gomantak

औरंगजेबाच्या अहंकाराला तडा

औरंगजेबाला वाटले होते की, हा छोटासा किल्ला अवघ्या काही तासांत किंवा दिवसांत जिंकता येईल. मात्र, रामशेजने औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला तब्बल 6 वर्षे दारात उभे ठेवले, ज्यामुळे मुघल सम्राटाचा अहंकार पूर्णपणे चक्काचूर झाला.

Ramshej Fort | Dainik Gomantak

मराठ्यांची गनिमी कावा

किल्ल्यावर दारुगोळा आणि तोफांची कमतरता असताना, मावळ्यांनी झाडांच्या विळख्यातून लाकडी तोफा तयार केल्या होत्या. त्यातून दगड आणि गोळे मारुन मुघल सैन्याला पळवून लावले गेले. मराठ्यांच्या या अद्भूत युद्धकौशल्याने मुघल चक्रावून गेले होते.

Ramshej Fort | Dainik Gomantak

तांत्रिक-मांत्रिकांचा अयशस्वी प्रयोग

6 वर्षे प्रयत्न करुनही जेव्हा मुघलांना किल्ला जिंकता आला नाही, तेव्हा त्यांनी किल्ला सर करण्यासाठी एका मांत्रिकाची मदत घेतली होती. त्या मांत्रिकाने एक सोन्याचा रथ बनवून किल्ल्यावर जादू करण्याचा प्रयत्न केला, पण मावळ्यांनी तो रथ आणि मांत्रिक दोघांनाही उद्ध्वस्त केले.

Ramshej Fort | Dainik Gomantak

अभेद्य वास्तुकला आणि गुप्त भुयार

रामशेज किल्ला हा नैसर्गिकरीत्याच एका उंच कड्यावर वसलेला आहे. किल्ल्यात गुप्त भुयारी मार्ग, पाण्याच्या टाक्या आणि संरक्षणासाठी उत्तम तटबंदी आहे. शत्रूला सहजासहजी वर चढता येऊ नये, अशी याची कठीण भौगोलिक रचना आहे.

Ramshej Fort | Dainik Gomantak

Orchha Fort: जगातील एकमेव ठिकाण! जिथे प्रभू रामाला देव नाही तर 'राजा' मानून पोलीस देतात 'गार्ड ऑफ ऑनर'; इतिहासप्रेमींचं स्वर्ग 'ओरछा'

orchha Fort | Dainik Gomantak
आणखी बघा