Akshata Chhatre
अयोध्येतील राम मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. हे स्थान हिंदू धर्मानुसार भगवान श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते.
1528 मध्ये बाबरी मशिदीचे बांधकाम करण्यात आले. हिंदू श्रद्धानुसार, ही मशिद राम जन्मभूमीवर बांधली गेली होती.
गल1992 मध्ये बाबरी मशिदीचा विध्वंस झाला, ज्यामुळे देशभरात मोठे दंगल आणि राजकीय व धार्मिक वाद निर्माण झाले.
2019 मध्ये, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीवरील वादावर अंतिम निर्णय दिला आणि राम मंदिराच्या बांधणीला मंजूरी दिली. हे निर्णय भारतीय इतिहासातील एक मोठे वळण होते.
5 ऑगस्ट 2020 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यात भाग घेतला.
आज, राम मंदिर अयोध्येत एक सांस्कृतिक धरोहर म्हणून उभं आहे. त्याची उभारणी देशभरातील लाखो भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक ठरली आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजच्या दिवशी, मंदिर उभारणीमुळे अयोध्येत धार्मिक पर्यटनाचा प्रभाव वाढला आहे.