Priyanka Deshmukh
हिंदू धर्मात, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा हा रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जातो.
यावेळी रक्षाबंधनाचा सण 11 ऑगस्टला होणार की 12 ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.
यावेळी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 पासून सुरू होत आहे. पौर्णिमेची तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 पर्यंत राहील.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी दोन शुभ मुहूर्त केले जात आहेत. सकाळी 11.37 वाजल्यापासून 12.29 वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.
दुसरा शुभ मुहूर्त,दुपारी 02.14 पासून सुरू होईल, जो 03.07 पर्यंत राहील. या शुभ मुहूर्तावर कधीही राखी बांधता येते.
रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदू धर्मातील मुली आणि महिला आपल्या भावाचे आभार व्यक्त करण्यासाठी राखी बांधतात.
राखी बांधण्यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी स्नान करून पूजेच्या ताटात रोळी, चंदन, अक्षत, दही, मिठाईसह तुपाचा दिवा लावा.
तसेच रेशमी धाग्याने बनवलेली राखी आपल्या भावाला बांधा
भावाची आरती करून त्याला मिठाई खाऊ घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.