Rajmachi Fort History: दोन बालेकिल्ल्यांचं अद्भुत रहस्य, बोरघाटावरचा स्वराज्याचा अजेय पहारेकरी; छत्रपतींचा बुलंद 'राजमाची'

Manish Jadhav

राजमाची किल्ला

राजमाची किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली असल्याचे मानले जाते. कोकण आणि घाटमाथा जोडणाऱ्या बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

दोन बालेकिल्ल्यांचे वैभव

राजमाची हा एकच किल्ला नसून श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन स्वतंत्र बालेकिल्ल्यांनी मिळून बनलेला आहे. श्रीवर्धन हा मुख्य बालेकिल्ला असून मनरंजन हा तुलनेने लहान आहे.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

स्वराज्यातील महत्त्व

इ.स. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी आणि लोहगड परिसर जिंकल्यानंतर राजमाची किल्ला स्वराज्यात सामील केला. स्वराज्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचे स्थान अत्यंत मोक्याचे होते.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

मुघलांशी संघर्ष

1689 मध्ये औरंगजेबाच्या काळात हा किल्ला काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला होता. मात्र, मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

कान्होजी आंग्रे यांचा प्रभाव

1713 मध्ये हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना सोपवला होता. त्यांच्या काळात किल्ल्याची तटबंदी आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले गेले.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

पेशवेकालीन वास्तुकलेचा वारसा

1730 च्या सुमारास पेशव्यांकडे या किल्ल्याचे नियंत्रण आल्यावर त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळभैरव मंदिराचे बांधकाम केले, जे आजही किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देते.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

ब्रिटीशांचा ताबा

1818 मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. मराठ्यांच्या शौर्याची अनेक प्रतीके या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये आजही पाहता येतात.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक अवशेष

गडावर आजही जुन्या वाड्यांचे अवशेष, पाण्याची टाकी आणि गुप्त दरवाजा पाहायला मिळतो. हे अवशेष त्या काळातील स्थापत्यशास्त्र आणि लष्करी नियोजनाची ओळख करून देतात.

Rajmachi Fort | Dainik Gomantak

Konkan Beach: दोन खाड्यांच्या कुशीत विसावलेलं निसर्गरत्न, क्षितिजावरील सुवर्णाचं लेणं; कोकणातील 'हा' बीच सृष्टीचं विलोभनीय रुप

आणखी बघा