Manish Jadhav
हरिहरेश्वरला धार्मिक महत्त्वामुळे 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. येथे हरिहरेश्वर, काळभैरव आणि योगेश्वरी यांची प्राचीन मंदिरे आहेत, जी पर्यटकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहेत.
हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छतेसाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
समुद्राच्या लाटांच्या धडकेने डोंगराला पडलेली भेग आणि तिथे तयार झालेली नैसर्गिक शिल्पे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. विशेषतः भरतीच्या वेळी हे दृश्य विलोभनीय दिसते.
हरिहरेश्वरमध्ये सावित्री नदी अरबी समुद्राला येऊन मिळते. हा संगम पाहणे हा एक सुखद अनुभव असतो.
साहसी पर्यटकांसाठी येथे बनाना राईड, जेट स्की आणि बोट राईड यांसारख्या विविध वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध आहे.
येथे येणारे पर्यटक अस्सल कोकणी जेवण आणि ताज्या सीफूडचा आस्वाद घेऊ शकतात. सोलकढी आणि उकडीचे मोदक ही येथील खासियत आहे.
हरिहरेश्वरपासून जवळच श्रीवर्धन आणि दिवेआगर हे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे एकाच ट्रिपमध्ये तुम्ही या तिन्ही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
प्रदक्षिणा मार्गावरील उंच कड्यावरुन दिसणारा सूर्यास्त हा महाराष्ट्रातील सर्वोत्तम सूर्यास्तांपैकी एक मानला जातो. निळ्याशार पाण्यात मावळणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब स्वर्गीय सुख देते.