Manish Jadhav
राजगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. हाच किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता.
हा किल्ला पुणे जिल्ह्यात असून भोरच्या वायव्येला 24 कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात आहे.
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादा डोंगर किंवा नदी ओलांडावीच लागते. राजगडाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड केली होती.
राजगड किल्ला हा इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे.
जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने राजगडाकडे फौज पाठवून जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली होती.
मात्र, 6 एप्रिल1663 रोजी स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची खोड मोडून महाराज राजगडावर परतले होते.
तसेच, 12 सप्टेंबर 1666 मध्ये जेव्हा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन परतले तेव्हा ते थेट राजगडावर पोहोचले होते.
राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत. वेळवंड, मळे, भूतुंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणसी, या मार्गाने गडावर जाता येते.