Manish Jadhav
जॅलिओ-ई मोबिलिटीने त्यांच्या ईवा इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. त्यामुळे आता फेसलिफ्ट मॉडेलसह इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे.
शहरांनुसार ती 3 मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन ईवा 2025 चा टॉप स्पीड ताशी 25 किमी असून एकदा चार्ज केल्यावर ती 120 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते.
दमदार स्पीडसोबत स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. तसेच, आरटीओमध्ये नोंदणी देखील करावी लागणार नाही.
ईवा इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राऊंड क्लीयरन्स 150 मिमी चांगला आहे, ज्यामुळे खडबडीत रस्त्यांवर चालवणे सोपे होते.
स्कूटरमध्ये 60/72 व्ही बीएलडीसीची शक्तिशाली मोटर बसवण्यात आली आहे.
स्कूटरचे वजन 85 किलो असून ती 150 किलोपर्यंतचा भार वाहून नेऊ शकते. याचा अर्थ असा की,स्कूटरवरुन दोन लोक आरामात प्रवास करु शकतात.
ही शानदार स्कूटर लिथियम-आयन आणि जेल बॅटरी दोन्ही प्रकारांमध्ये येते. लिथियम-आयन प्रकारांमध्ये, 60V/30AH मॉडेलची किंमत 64,000 आहे, जी 90-100 किमीची रेंज देते, तर 74V/32AH व्हर्जन मॉडेलची किंमत 69,000 आहे, जी 120 किमीची रेंज देते.
इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात डिजिटल डिस्प्ले, डेटाइम रनिंग लाइट्स, कीलेस ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, पार्किंग गियर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि पॅसेंजर फूटरेस्ट अशा अनेक सुविधा आहेत.