Sameer Panditrao
गौतमीपुत्र सातकर्णी याने मुरंबदेव डोंगरावर किल्ला बांधला. पुढे हा किल्ला बहमनी राजवटीकडे होता.
नंतर किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर 125 वर्षे कोणाचाही हल्ला झाला नाही.
1625 ला हा किल्ला आदिलशहाकडे गेला, 1630 च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला.
सन 1646 च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला ताब्यात घेतला आणि डागडुजी केली.
डोंगर, जंगल, नद्यांनी वेढलेला हा परिसर सुरक्षित असल्याने शिवाजी महाराजांनी राजगडाची आपली पहिली राजधानी म्हणून निवड केली.
राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे.
पुणे शहरापासून राजगडाला एसटीने जाणे सोयीचे आहे. तुम्ही खाजगी वाहनाने इथे जाऊ शकता.