Goa Beaches: गोव्याचे लपलेले रत्न म्हणजे 'हा' किनारा! तुम्ही भेट दिली आहे का?

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील किनारे

गोव्यातील पर्यटनाचा मध्यबिंदू म्हणजे गोव्याचे किनारे आहेत. आज आपण अशाच एका सुंदर किनाऱ्याची माहिती घेऊ.

राजबाग किनारा

हा सुंदर किनारा आहे दक्षिण गोव्यातील राजबाग किनारा जो काणकोण परिसरात येतो.

राजबाग रेसिडेन्सी

समुद्र किनाऱ्याजवळील प्रसिद्ध राजबाग रेसिडेन्सीवरून त्याला राजबाग या नावाने ओळखले जात आहे.

स्वच्छ किनारा

गोव्यातील स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यांच्या यादीत याचे नाव नक्कीच घेतले जाते.

छोटा आणि रेखीव किनारा

एका बाजूला झाडांची किनार लाभलेला हा छोटा किनारा अत्यंत रेखीव आहे.

मासेमारी नौका

इथे मासेमारी नौकांची सतत हालचाल सुरु असते. मासेमारीचा तुम्ही इथून जवळून अनुभव घेऊ शकता.

कसे जाल

हा किनारा मडगावपासून ४२ तर पणजीपासून ७० किमी आहे. तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा खाजगी वाहनाने सहज इथे पोचू शकता.

आणखी पाहा