Pranali Kodre
जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली.
ही कसोटी मालिकेत अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली. तसेच 5 भारतीय खेळाडूंसाठी तर ही मालिका अत्यंत खास ठरली.
या मालिकेतील भारताकडून 5 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले.
रजत पाटीदारचे या मालिकेतील विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण झाले. तो भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 310 वा खेळाडू ठरला.
23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने या कसोटी मालिकेतील राजकोटला झालेल्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केले. तो कसोटी पदार्पण करणारा भारताचा 311 वा खेळाडू ठरला.
जुरेलसह 26 वर्षीय सर्फराज खाननेही राजकोट कसोटीतून पदार्पण केले. तो कसोटी पदार्पण करणारा भारताचा 312 वा खेळाडू ठरला.
आकाश दीपने या कसोटी मालिकेतील रांचीला झालेल्या चौथ्या कसोटीतून पदार्पण केले. तो कसोटी पदार्पण करणारा भारताचा 313 वा खेळाडू ठरला.
देवदत्त पडिक्कलला या मालिकेतील धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यीतून पदार्पणाची संधी मिळाली. तो कसोटी पदार्पण करणारा 314 वा भारतीय खेळाडू ठरला.