Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 7 मार्चपासून कसोटी मालिकेतील पाचवा सामना धरमशाला येथे खेळला गेला, तर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ख्राईस्टचर्च येथे 8 मार्चपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे.
या दोन्ही सामन्यांत मिळून 4 खेळाडूंनी 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे.
धरमशाला कसोटी आर अश्विन आणि जॉनी बेअरस्टो यांची, तर ख्राईस्टचर्च कसोटी टीम साऊदी आणि केन विलियम्सन यांची कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.
दरम्यान या चारही खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्या संघांकडून 100 व्या कसोटीसाठी कॅप देण्यात आली.
धरमशाला येथे अश्विनची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुली उपस्थित होत्या.
तसेच बेअरस्टोचीही आई, बहिण, त्याची पार्टनर आणि मुलगा धरमशाला येथे उपस्थित होते.
केन विलियम्सन आणि टीम साऊदी यांचेही कुटुंबिय ख्राईस्टचर्चमध्ये उपस्थित होते. तसेच त्यांची मुलं त्यांच्याबरोबर राष्ट्रगीतासाठीही सोबत आली होती.