Manish Jadhav
रायसेन किल्ला इसवी सन 1200 च्या सुमारास विंध्य पर्वतरांगेत एका उंच टेकडीवर बांधण्यात आला. या किल्ल्यावर अनेक हिंदू आणि मुस्लिम शासकांनी राज्य केले.
लोककथेनुसार, या किल्ल्याच्या राजाकडे 'पारस पत्थर' होता. शत्रूच्या हाती तो लागू नये म्हणून राजाने तो किल्ल्यातील तलावात फेकून दिला, जो आजही तिथेच असल्याचे मानले जाते.
किल्ल्यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी 40 हून अधिक विहिरी आणि टाके आहेत. त्याकाळी वापरलेली ही 'वॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा आजही आधुनिक इंजिनिअर्सना थक्क करते.
या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच परिसरात महादेवाचे मंदिर आणि एक मशीद आहे. हे ठिकाण धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण मानले जाते.
किल्ल्यामध्ये 'अत्तरदान महल', 'बादल महल' आणि 'राजा रोहित महल' यांसारख्या भव्य वास्तू आहेत, ज्या त्या काळातील वैभव दर्शवतात.
येथील काही महालांमध्ये अशी रचना केली आहे की, एका कोपऱ्यात हळू बोललेले शब्द दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू येतात, जे वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.
राजा रायसिंग आणि राणी दुर्गावती यांच्या शौर्याच्या कथा या किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. अनेक आक्रमणांनंतरही या किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम उभी आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते. गडावरून आसपासच्या परिसराचे आणि विंध्य पर्वतरांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.