Sameer Amunekar
रायरेश्वर हे ते ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
रायरेश्वरला भोर व वाई या दोन्ही बाजूंनी जाता येते. पायथ्यापर्यंत गाडी जाते, त्यानंतर अंदाजे ३०० पायऱ्यांचा चढ आहे.
पायऱ्यांच्या बाजूला लोखंडी रॉड्स लावलेले आहेत व शेवटच्या कड्यावर चढण्यासाठी लोखंडी पायऱ्यांची शिडी बसवलेली आहे.
समुद्रसपाटीपासून रायरेश्वरची उंची सुमारे ४६०० फूट आहे, ज्यामुळे परिसरात थंडावा व सुंदर निसर्गसृष्टी अनुभवता येते.
मंदिराकडे जाताना जिवंत झरा व त्यावर असलेले गोमुख दिसते. या झऱ्याला बारा महिने पाणी असते आणि गडावरचे रहिवासी तेच पाणी पितात.
स्वयंभू रायरेश्वर शंकराचे मंदिर पांडवकालीन मानले जाते. गाभाऱ्याचे दगडी खांब अद्याप मूळ स्थितीत आहेत.
मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून दगडी आहे. गाभाऱ्यात फक्त पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनाच प्रवेश आहे.