Sameer Amunekar
दिवसभराचा थकवा, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज होतो. कोरफड त्वचेला ताजेतवाने करते.
कोरफडीतील जेल त्वचेला खोलवर ओलावा देऊन ती मऊ व तजेलदार ठेवते.
कोरफडीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांची वाढ थांबवतात आणि जुन्या पिंपल्सचे डाग हलके करतात.
उन्हामुळे किंवा इतर कारणांनी झालेल्या त्वचेच्या सूजेला आराम मिळतो.
डोळ्याखाली हलके लावल्यास सकाळी काळी वर्तुळे व पफिनेस कमी जाणवतात.
नियमित वापरामुळे त्वचेत नैसर्गिक तजेला येतो व सुरकुत्या उशिरा पडतात.
रात्रभर नैसर्गिक उपचार मिळाल्याने सकाळी चेहरा चमकदार व हेल्दी वाटतो.