Sameer Panditrao
अवकाळी पावसाने सांगे भागाला गुरुवारी झोडपून काढले. जुनेवाडा-वाडे-कुर्डी येथील घरावर पावसाळी वाऱ्यासोबत नीरफणस व पोफळीचे झाड पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
सुरावली गावातील महत्त्वाचा रस्ता खचल्याने तेथील नागरिक हतबल झाले आहेत. लोकांचा तसेच वाहनांचा ये-जा करण्याचा हा महत्त्वाचा रस्ता आहे.
सत्तरीत वादळी वाऱ्या-पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड सुरू आहे. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळ गुलमोहराचे झाड रस्त्यावर पडले.
येथील मडगाव नगरपालिकेच्या प्रभाग २५ मधील एक रस्ता अवकाळी पावसामुळे नाहीसाच झाला आहे. या रस्त्याचे हल्लीच डांबरीकरण झाले होते.
अवकाळी पावसामुळे खोब्रावाडा-कळंगुट येथे पार्क करून ठेवण्यात आलेल्या एकूण 5 कारगाड्यांवर आंब्याचे झाड कोसळले. या घटनेत पाचही कारगाड्यांचे मोठे नुकसान झाले.
पावसात मरड-म्हापसा येथील सरकारी इमारतीजवळील सर्व दुकाने पाण्याखाली गेली. तर, ‘बार्देश बझार’मध्ये पाणी घुसले व मोठे नुकसान झाले.
वळवई ग्रामपंचायत क्षेत्रातील घरावर आंबाड्याचे झाड पडून त्यांचे बरेच नुकसान झाले.स्थानिक युवकांनी फोंडा अग्निशामक दलातील जवानांच्या सहकार्याने झाड कापून काढले.