Manish Jadhav
कांदा प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात वापरला जातो. कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीतर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
कांद्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, बी6, फोलेट, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात.
आज (22 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कांद्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत...
कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
कांद्यात असलेले एलिल सल्फाइड्स रक्तदाब कमी करण्यासोबत हृदयविकाराचा धोका कमी करते.
कांद्यात असलेले फायबर आणि प्रीबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यासोबत पोटाच्या समस्या दूर करतात.
कांदा डोळ्यांची कमजोरी दूर करतो आणि डोळे निरोगी ठेवतो.