Raigad Fort: काळ थांबला, इतिहास नमला! जेव्हा सूर्य मावळला आणि रायगडचा कडा कडा रडला; छत्रपतींच्या शौर्याचा जिवंत दस्तऐवज

Manish Jadhav

स्वराज्याची राजधानी

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची भौगोलिक तटबंदी पाहून 1670 च्या दशकात या गडाला स्वराज्याची अधिकृत राजधानी बनवले.

Raigad Fort | Dainik Gomantak

शिवरायांचा राज्याभिषेक

6 जून 1674 रोजी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्वभौम 'शिवराज्याभिषेक' सोहळा संपन्न झाला आणि हिंदवी स्वराज्य साकारले.

Raigad Fort | Dainik Gomantak

जगात अद्वितीय रचना

महाराजांचे मुख्य शिल्पकार 'हिरोजी इंदुलकर' यांनी रायगडवर भव्य राजवाडा, बाजारपेठ, आणि विस्तीर्ण इमारतींची अभूतपूर्व रचना केली.

Raigad Fort | Dainik Gomantak

'हिरकणी'चा थरार

आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात गडाचा उभा कडा उतरुन जाणाऱ्या 'हिरकणी'च्या असीम मातृत्वाची साक्ष हा किल्ला देतो.

Raigad Fort | Dainik Gomantak

शिवछत्रपतींची समाधी

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवरच अंतिम श्वास घेतला. गडावर असलेली त्यांची समाधी आजही कोट्यवधींचे प्रेरणास्थान आहे.

Raigad Fort | Dainik Gomantak

मुघलांचे आक्रमण आणि झुंजार लढा

शिवरायांच्या निधनानंतर 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान याने रायगडला वेढा घातला, ज्याला मराठ्यांनी कडाडून विरोध केला.

Raigad Fort | Dainik Gomantak

पेशवेकाळ आणि इंग्रजांचा हल्ला

उत्तरकाळात हा किल्ला पेशव्यांच्या नियंत्रणात होता; मात्र मे 1818 मध्ये ब्रिटिश कर्नल प्रॉथरने केलेल्या तोफमारीत गडावरील अनेक वास्तू जळून खाक झाल्या.

Raigad Fort | Dainik Gomantak

दुर्गराज रायगडचे दिव्य वैभव

आजही गडावरील महादरवाजा, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर आणि भव्य राजदरबार मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळाची भव्यता दाखवून देतात.

Raigad Fort | Dainik Gomantak

Korigad Fort: काळ बदलला, पण ऐट कायम! सिद्दीच्या वादळाला रोखणारी ढाल, 'लक्ष्मी तोफेचा' अंगार; स्वराज्याची आण 'कोरीगड'

आणखी बघा