Manish Jadhav
कोरीगड किल्ल्याचा इतिहास 15व्या शतकापूर्वीचा म्हणजेच बहमनी किंवा निजामशाही कालखंडा इतका जुना मानला जातो.
इ.स. 1657 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला आणि त्याची तटबंदी मजबूत केली.
जंजिऱ्याच्या सिद्दीच्या आक्रमणांपासून मावळ प्रांताचे आणि पुण्याचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा लष्करी तळ म्हणून वापर होत असे.
उत्तरकाळात छत्रपतींनी या किल्ल्याची जबाबदारी भोरचे पंत सचिव यांच्याकडे सोपवली, ज्यांनी पेशवेकाळात हा किल्ला सुरक्षित ठेवला.
मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने कोरीगड किल्ल्याला भारी तोफखान्यासह वेढा घातला होता.
लढाईदरम्यान इंग्रजांचा एक तोफेचा गोळा थेट किल्ल्यावरील मुख्य दारुगोळा कोठारावर पडल्याने तिथे मोठा विस्फोट झाला.
दारूगोळा संपल्यामुळे 11 मार्च 1818 रोजी हा किल्ला मराठ्यांच्या किल्लेदाराला नाइलाजाने ब्रिटिशांच्या स्वाधीन करावा लागला.
किल्ल्यावर आजही ऐतिहासिक 'लक्ष्मी तोफ' आणि कोराई देवीचे मंदिर असून, ही विस्तीर्ण तटबंदी स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देते.