Manish Jadhav
मंगळवारी (19 नोव्हेंबर) टेनिस चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.
22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला, ज्यात त्याला पराभव पत्करावा लागला. यासह त्याची कारकीर्द संपली. नदालने हा सामना 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये गमावला.
नदालने गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. डेव्हिस चषकातील हा शेवटचा सामना असेल असे त्याने सांगितले होते.
बोटिकने या सामन्यात सुरुवातीपासूनच नदालला कडवी टक्कर दिली. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालचा 6-4 अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सेटमध्येही बोटिकने 5-4 अशी आघाडी घेतली होती, पण नदालने पुनरागमन करत 4-3 अशी आघाडी घेतली. मात्र त्याला हा सेटही जिंकता आला नाही. बोटिकने दुसरा सेटही 6-4 असा जिंकून सामना जिंकला.
डेव्हिस कपमधील शेवटचा सामना खेळण्यापूर्वी नदाल भावूक झाला होता. राष्ट्रगीत सुरु असताना नदाल भावूक झाला. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.
24 - नोव्हाक जोकोविच, 22 - राफेल नदाल, 20 - रॉजर फेडरर, 14 - पीट सॅम्प्रास, 12 - रॉय इमर्सन.
नदालने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या अलीकडच्या काळातील संघर्ष आणि खेळाचा त्याच्या शरीरावर झालेला परिणाम याबद्दल सांगितले होते.