Manish Jadhav
गोव्याला एकदा भेट देणारा पर्यटक कधीच निसर्गाची उधळण झालेलं हे राज्य विसरु शकत नाही.
गोव्याच्या निसर्गाचं लालित्य पर्यटकांच्या मनावर एवढी छाप सोडतं की, पर्यटकांचं मनही गोव्याला साथ तुझी माझी म्हणू लागतं.
कधी-कधी गोव्यातचं पर्यटकांना त्यांच्या आयुष्याची सोबतीन मिळते. इथेच दिले-से दिल मिळतात.
तुम्ही मराठी कवयत्री बहिणाबाईंची कविता ती ऐकली असेलच... मन ओढाय... ओढाय... ही कविता पर्यटकांसाठी चपखल बसते.
पर्यटक जेव्हा गोव्यात एकदाचा पोहोचतो तेव्हा 'चलो मेरा गोवा आया' असं त्याचं मनही म्हणू लागतं.
गोव्याचं निर्मळ, नितळ सौंदर्य पर्यटकांच्या सौख्याची नांदी बनून जातं.