World Cup: 23 वर्षांच्या रचिनने मोडला सचिनचा विक्रम

Pranali Kodre

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 4 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संघात सामना झाला.

Rachin Ravindra

रचिन रविंद्रचे शतक

या सामन्यात न्यूझीलंडचा 23 वर्षीय खेळाडू रचिन रविंद्रने शतक ठोकत नवे विक्रम रचले आहेत.

Rachin Ravindra

तिसरे शतक

रचिनने 94 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 15 चौकार आणि 1 षटकार मारला. हे रचिनचे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील तिसरे शतक आहे.

Rachin Ravindra

विश्वविक्रम

रचिनने कारकिर्दीतील पहिल्या वनडे वर्ल्डकपमध्ये तीन शतके करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

Rachin Ravindra

पहिलाच क्रिकेटपटू

त्याचबरोबर वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच वर्ल्डकपमध्ये 3 शतके करणाराही तो पहिलाच क्रिकेटपटू आहे.

Rachin Ravindra

सचिनचा विक्रम मोडला

रचिनने वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिनने 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये 2 शतके केली होती.

Rachin Ravindra

न्यूझीलंडकडूनही मोठा विक्रम

त्याचबरोबर रचिन न्यूझीलंडकडूनही एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 3 शतके करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Rachin Ravindra

रचिनच्या नावात द्रविड अन् सचिन

विशेष गोष्ट अशी की रचिनचे नाव त्याच्या आई-वडीलांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावावरून ठेवले आहे. रचिन नावातील 'र' हे अक्षर राहुल द्रविडच्या नावातील आहे आणि 'चिन' ही अक्षरे सचिनच्या नावातील आहे.

Rachin Ravindra

टीम इंडियात हार्दिकची जागा घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाची कशीये कामगिरी?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prasidh Krishna | X
आणखी बघण्यासाठी