Manish Jadhav
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. पाकिस्तानात घुसून भारताने ही कारवाई केली.
भारताने या कारवाईत अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला. यामध्ये SCALP क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोइटरिंग म्यूनिशन यांचा समावेश होता.
हे क्षेपणास्त्र ब्रिटनमध्ये स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखले जाते. लांब पल्ल्याचे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. युरोपियन कंपनी एमबीडीएने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. या क्षेपणास्त्राचाच भारताने पाकिस्तानविरोधातील कारवाईत वापर केला.
लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या बंकर आणि बहुमजली इमारतींवर हल्ला करण्यासाठी भारताने हॅमर स्मार्ट बॉम्बचा वापर केला. हॅमर 50-70 किलोमीटरच्या श्रेणीतील टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
लोइटरिंग म्यूनिशन हे एक मानवरहित हवाई शस्त्र आहे. या शस्त्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या टार्गेटवर घिरट्या घालून शत्रूंची ठिकाणे नष्ट करते.