Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 7 ते 11 मार्च 2024 दरम्यान कसोटी मालिकेतील पाचवा सामना होणार आहे.
धरमशाला मधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
हा सामना भारताचा फिरकीपटू आर अश्विनसाठी खास आहे. कारण हा त्याला कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.
त्यामुळे या 100 व्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना अश्विनने त्याला गोलंदाजी करायला आवडणाऱ्या फलंदाजांबद्दलही सांगितले.
अश्विनने सांगितले की त्याला स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, जो रुट अशा दिग्गज फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करायला आवडते. त्यांच्यामुळे तो त्याच्यातील सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतो.
दरम्यान अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीला कसोटी पदार्पण केले होते.
अश्विन आत्तापर्यंत खेळलेल्या 99 कसोटीत 23.91 च्या सरासरीने 507 विकेट्स घेतल्या आहेत. यात 35 वेळा त्याने एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच अश्विनने फलंदाजी करतानाही 5 शतकांसह 3309 धावा केल्या आहेत.