Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे.
आयपीएलच्या या 17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे.
दरम्यान, या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सची तयारी सुरू झाली असून चेन्नईत सराव शिबीरही सुरू झाले आहे.
आता चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी देखील चेन्नईत दाखल झाला आहे.
त्यामुळे धोनीही लवकरच आयपीएल 2024 च्या तयारीला सुरुवात करणार आहे.
धोनीच्या आधीच मार्चच्या पहिल्याच आठवड्यात चेन्नई सुपर किंग्स संघातील अनेक खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहे. यात ऋतुराज गायकवाड, दीपक चाहर, मुकेश चौधरी यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, यंदा चेन्नई सुपर किंग्सचा हेतू सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा असेल. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ५ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.