Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात राजकोटमध्ये 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला गेला.
या सामन्याच्या पहिल्या डावात आर अश्विनने झॅक क्रावलीला बाद केले. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट ठरली.
अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात खेळताना 500 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.
अश्विन 500 विकेट्स घेणारा जगातील नववा गोलंदाज ठरला, तर भारताचा अनिल कुंबळे (619 विकेट्स) दुसराच गोलंदाज ठरला.
तसेच तो सामन्यांच्या बाबतीतच सर्वात जलद 500 कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी पहिल्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने 87 सामन्यात 500 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच अश्विन सर्वात कमी चेंडू टाकत 500 कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 25714 वा चेंडू टाकताना 500 वी विकेट घेतली. या यादीत त्याच्यापुढे फक्त ग्लेन मॅकग्रा (25528 चेंडू) आहे.
अश्विनने फलंदाजी करताना कसोटीत 3000 हून अधिक धावाही केल्या आहेत. त्यामुळे तो कसोटीत 500 विकेट्स आणि 3000 धावा करणारा शेन वॉर्न आणि स्टुअर्ट ब्रॉडनंतरचा केवळ तिसराच खेळाडू आहे.
दरम्यान, अश्विनला 500 वी विकेट घेतल्यानंतर मात्र राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर तातडीने कुटुंबात उद्भवलेल्या मेडिकल एमर्जन्सीमुळे घरी परतावे लागले. त्यामुळे तो उर्वरित राजकोट कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.