Sameer Panditrao
१९४२ साल उजाडलं होतं.
ब्रिटीशांना आता काहीही करून देशातून हद्दपार करायचं असा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घेतला.
८ ऑगस्ट १९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले.
यावेळी आंदोलनाचे उद्देश स्पष्ट करताना त्यांनी 'करेंगे या मरेंगे' अशी घोषणा केली.
भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.
९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांनी महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला.
हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.