Sameer Panditrao
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही.
जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय,
माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे
कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये.
महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात.
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन,कारण ते जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो.
एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे.