Sameer Amunekar
सुरुवातीला सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरची धूळ, अतिरिक्त तेल आणि घाम निघून जाण्यास मदत होते.
चेहरा धुतल्यानंतर थंड पाण्याचे काही शिंतोडे मारा. यामुळे त्वचेला फ्रेश आणि ताजेतवाने वाटू शकते.
कॉटन पॅड किंवा हाताच्या मदतीने त्वचेला योग्य असा हायड्रेटिंग टोनर लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते.
तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार हायलुरॉनिक अॅसिड किंवा नियासिनामाइडसारखे सीरम वापरू शकता. काही थेंब घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने पसरवा.
त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हलका मॉइश्चरायझर लावा. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य उत्पादन निवडा.
दिवसा बाहेर पडणार असाल तर ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. चेहरा, मान आणि उघड्या भागांवर पुरेशा प्रमाणात लावणे महत्त्वाचे आहे.
ही छोटी रुटीन नियमित केल्यास त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड आणि फ्रेश दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र, नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल.