Sameer Amunekar
बीटरूटच्या मदतीने गालांना नैसर्गिक गुलाबी रंग आणि फ्रेश लुक देता येतो.
बीटरूट बारीक करून त्याचा रस काढा. स्वच्छ बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा आणि गालांवर हलका थर लावा.
२ चमचे बीटचा रस आणि १ चमचा कोरफडीचा जेल मिसळा. ही क्रीम विशेषतः कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकते.
बीटचा छोटा तुकडा गालांच्या हाडांवर हलक्या हाताने फिरवा आणि बोटांनी रंग व्यवस्थित ब्लेंड करा.
बीटरूटचा रंग तीव्र असू शकतो. त्यामुळे सुरुवातीला थोडेच लावा आणि गरज असल्यास दुसरा पातळ थर द्या.
चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करा. बीटचा रस कपडे, हात आणि सिंकवर डागही पाडू शकतो.
फक्त बीटरूटचा रस साधारण एक आठवडा फ्रिजमध्ये ठेवता येतो, तर कोरफड मिसळलेले मिश्रण १०–१४ दिवसांत वापरणे योग्य. दुर्गंध किंवा रंगात बदल दिसल्यास वापरू नका.