गोमन्तक डिजिटल टीम
केपे मार्केट म्हणजे गोव्याची संस्कृती, परंपरा आणि स्थानिक चवींचा खजिना असलेला बाजार आहे. इथला प्रत्येक स्टॉल तुम्हाला गोव्याची अस्सल ओळख करून देईल.
हंगामी आंबा, कोकम, काजू या फळांपासून हिरव्यागार भाज्या या बाजारात मिळतील. ही फळे आणि भाज्या आसपासच्या परिसरातूनच येतात.
गोव्यातील कलाकारांच्या हातातून घडलेल्या लाकडी आणि मातीच्या वस्तू ही इथली खासियत. यात तुम्हाला भरपूर श्रेणी पाहायला मिळतील.
गोव्यातील स्थानिक पदार्थांची चव तुम्हाला चाखता येईल. खासकरून बेबिंका, कोकडा या पदार्थांचा आस्वाद घ्यायला चुकू नका.
इथे तुम्हाला स्थानिक पातळीवर तयार झालेले गोवन मसाले विकत घेऊ शकता. या मसाल्यांची चव तुमच्या जेवणाला खास चव देईल.
स्थानिक मच्छिमारांनी आणलेले ताजे मासे घेण्यासाठी ही बाजारपेठ अगदी योग्य ठिकाण आहे. इथे उपलब्धतेनुसार इतर सीफूडही मिळेल.
सकाळी ८ पासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत तुम्ही इथे खरेदी करू शकता. गोव्याची सांस्कृतिक विविधता या बाजारात तुम्ही अनुभवू शकता.
गोव्याच्या संगीत परंपरेतील 'हे' लोकप्रिय वाद्य आपणास माहित आहे का?