Goan Instruments: गोव्याच्या संगीत परंपरेतील 'हे' लोकप्रिय वाद्य आपणास माहित आहे का?

गोमन्तक डिजिटल टीम

समृद्ध संगीत परंपरा

गोवा राज्याच्या सांस्कृतिक विविधतेमुळे गोव्याची संगीत परंपरा शास्त्रीय ते पाश्चात्य संगीतशैलीनी समृद्ध बनलेली आहे.

Instruments

वाद्यांची श्रेणी

इतक्या वैविध्यपूर्ण संगीत परंपरेमुळे इथल्या वाद्यपरंपरेची श्रेणीही मोठी आहे. अरब, कांसाळे, मृदुंग अशी अनेक वाद्ये इथल्या संगीत संयोजनात ऐकायला मिळतात.

Ghumat, Mrudanga

लोकप्रिय वाद्य

घुमट हे इथले लोकप्रिय स्थानिक वाद्य. अनेक वर्षांपासून हे वाद्य गोव्याच्या संगीतात वापरले जाते.

Ghumat

दोन तोंडे

या तालवाद्याची रचना म्हणजे हे दोन तोंड असलेले मातीचे भांडे आहे. मडक्यासारखाच याचा आकार असतो.

Ghumat

कातडयाचा वापर

या मातीच्या भांड्याच्या मोठ्या तोंडावर घोरपडीचे कातडे घट्ट बसवले असते. या प्रक्रियेमुळे हवेचा दाब निर्माण होतो.

Ghumat

सुंवारी वादन

दोरीच्या साहाय्याने हे वाद्य गळ्यात अडकवतात किंवा काही ठिकाणी कमरेला बांधतात. घुमटाच्या खास वादनशैलीला सुंवारी असे म्हणले जाते.

Ghumat

घुमटाची साथ

गोव्यातील सगळे सण तसेच सामूहिक उत्सवांवेळी हे वाद्य इतर वाद्यांच्या साथीला वापरले जातेच. घुमटाच्या साथीने आरती, जागरण ऐकणे ही तर पर्वणीच.

Ghumat, Bhajan

तरुणांची पथके

गोव्यातल्या प्रत्येक गावात, वाडीत घुमट वाजवणारे कलावंत आहेत. तरुणांनी घुमट वादनाची पथके तयार करून ही कला प्रवाही ठेवली आहे विशेष.

Ghumat

गोव्याचा नैसर्गिक समतोल राखणारी 'खारफुटी'

Mangrove
आणखी पाहा