Akshata Chhatre
मानवी नातेसंबंध हे नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात. कोणतंही नातं आदर, समजूत, प्रामाणिकपणा आणि संयमावर टिकतं.
स्त्रियांना एखाद्या पुरुषामध्ये काय भावतं हे ठरवणं तसं अवघड असलं, तरी चाणक्यनीती या शास्त्रात यावर सुस्पष्ट विचार मांडलेला आहे.
चाणक्यांनी एका श्लोकात स्त्रियांना प्रभावित करणारे पुरुषांचे पाच गुण सांगितले आहेत श्रवण, शील, गुण, आचरण आणि प्रामाणिकता.
स्त्रियांना केवळ आकर्षक दिसणारे नव्हे, तर विचारशील, नम्र, आणि जबाबदार पुरुष आकर्षित करतात.
जो पुरुष नात्यात प्रामाणिक असतो, चुका मान्य करतो आणि संवादाद्वारे नातं सांभाळतो, तो तिच्यासाठी विशेष ठरतो.
स्त्रियांना त्यांचं ऐकून घेणारा, त्यांचे विचार समजून घेणारा पुरुष हवासा वाटतो. आदराने वागणं, त्यांचा आत्मसन्मान जपणं, आणि त्यांना स्वतंत्र निर्णय घेऊ देणं हे गुण तिच्या मनात घर करतात.