Akshata Chhatre
चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील पुष्पा साधारण फायर नाही तर वाईल्डफायर आहे आणि याच पुष्पाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
सध्या फक्त दक्षिणेत नाही तर सगळ्या देशात राज्य करणाऱ्या पुष्पराज शिवाय इतर कोणतंही नावं ऐकू येत नाहीये.
बाहेरून केवळ लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित वाटत असला तरीही पुष्पा-२ मध्ये अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य केलं गेलंय.
या चित्रपटाच्या शेवटी निर्मात्यांनी आणखीन एक कोडं ठेवलंय आणि ते काय हे पाहण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल.
शेवटच्या सीनमध्ये पुष्पा त्याच्या परिवारासोबत आनंदी असतो आणि एवढ्यात तिथे एक जबरदस्त बॉम्बब्लास्ट होतो.
पण हा बॉम्बब्लास्ट करण्यामागे नेमकं शेखावत आहे की खरा सूत्रधार कोणी वेगळाच आहे हे अजून समजलेलं नाही.