Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांना खूप महत्त्व होते. या किल्ल्यांपैकीच एक पुरंदरचा किल्ला होता.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आणि महत्वाचा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असून सासवड गावाजवळ आहे.
11व्या शतकात यादव राजवटीत हा किल्ला बांधला गेला, असे मानले जाते.
यादव, बहामनी सल्तनत आणि आदिलशाही यांसारख्या वेगवेगळ्या शासकांनी या किल्ल्यावर राज्य केले.
मराठा साम्राज्यासाठी पुरंदर किल्ला खूप महत्वाचा होता. शहाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मराठा साम्राज्यात सामील करुन घेतला होता.
पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. हे या किल्ल्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्ये आहे.