Sameer Amunekar
पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ, समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर वसलेला आहे.
हा किल्ला १६व्या शतकात बांधला गेला असून, मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली.
पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत प्रिय किल्ला होता आणि मराठ्यांच्या लढाऊ सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो.
१४ मे १६५७ रोजी याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते.
१६६५ साली शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती जयसिंग यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह" याच ठिकाणी झाला.
किल्ल्याची बांधणी दोन भागात आहे. वरचा पुरंदर आणि खालचा पुरंदर. वरच्या भागात तटबंदी, बुरुज आणि मंदिरे आहेत.
पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. येथून दिसणारा निसर्गसौंदर्य आणि प्राचीन वास्तू पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.