Sameer Panditrao
यंदा देशात अनेक राज्यांना अतिवृष्टी, पुराचा सामना करावा लागला.
अलीकडेच आलेल्या पुरामुळे पंजाबमध्ये मातीची संरचना बदलून पोषण घटकांमध्ये असमतोल निर्माण झाला आहे.
या बदलांमुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा पंजाब कृषी विद्यापीठाने दिला आहे.
पंजाबमधील गुरुदासपूर, अमृतसर, कपूरथळा, पठाणकोट, तरण तारण आदी जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला.
पुराबरोबर वाहून आलेला गाळ, वाळू शेतांत पसरला. या जिल्ह्यांतील मातीचे नमुने घेण्यासाठी व रब्बीची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने पथके तयार केली.
पूरानंतर शेतांमध्ये साचलेल्या गाळाची खोली, रचना आणि घटकांमध्ये मोठा फरक आढळले.
मातीच्या नमुन्यात मातीची रचना वाळू ते चिकणमातीमिश्रित असल्याचे आढळले. तिचे पीएच मूल्य अल्कलाईन स्वरूपाचे असून खारटपणाचा मोठा धोका नसल्याचेही निदर्शनास आले.
मोठे रहस्य उलगडणार! 'चिखलाचा' ज्वालामुखी भारतात कसा?