गोमन्तक डिजिटल टीम
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर आणि आसपासच्या भागातील केशर उत्पादक आधीच हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देत आहेत.
त्यातच आता साळिंदरांमुळे मोठ्या प्रमाणावर केशराच्या कंदांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
आधीच घटलेले केशर उत्पादन आणखी घसरू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पंपोर, कोनिबल, दुसू, लेथपोरा आणि आसपासच्या भागातील उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, साळिंदर दररोज रात्री शेतात घुसून कंद उकरून खातात.
शेतकऱ्यांच्या मते, डिसेंबर ते मार्च हा काळ कंदांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो.
याच काळात साळिंदर मोठ्या प्रमाणावर कंद उकरून खातात, ज्यामुळे भविष्यातील उत्पादनावर वाईट परिणाम होतो.
काश्मीरमधील केशर उत्पादन हवामान बदल, सिंचनाची कमतरता, उच्च दर्जाच्या कंदांचा अभाव आणि लागवडीचे क्षेत्र कमी होणे अशा अनेक कारणांमुळे आधीच घटले आहे.