Sameer Panditrao
गोंड आदिवासी जमातीचं उगमस्थान असलेलं एक महत्वाचं स्थान भारतात आहे.
महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेलं, महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातील, सालेकसा तालुक्यातील हे अद्भुत ठिकाण आहे म्हणजे कचारगड.
याला गोंड आदिवासी जमातीचे संस्थापक 'पारी कोपार लिंगो' ह्यांचं निवासस्थानही मानले जाते.
दरवर्षी महाशिवरात्रीला येथे संपूर्ण गोंड जमातीची प्रचंड मोठी यात्रा भरते.
५१८ मीटर उंचावरील हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याचा अचंबित करणारा ठेवा आहे.
पाच हजार वर्षें पुरातन, आशिया खंडातील सगळयांत मोठया असलेल्या नैसर्गिक गुहांमध्ये या ठिकाणचे नाव घेतले जाते.
इथे वन्यजीव, खासकरून सापांचा वावर आहे त्यामुळे काळजी घेऊनच इथे फिरायला जा.