Sameer Amunekar
उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरावर ताण येतो आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो. बसून पाणी प्यायल्याने शरीराला व्यवस्थित हायड्रेशन मिळते.
एकदम गटागट पाणी पिण्यापेक्षा घोटघोट प्यायल्याने शरीराला ते योग्य प्रकारे शोषून घेता येते.
जेवणाच्या आधी 30 मिनिटे आणि जेवणानंतर 30-45 मिनिटांनी पाणी प्यावे. जेवणाच्या दरम्यान जास्त पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनसंस्था सुधारते.
जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेचा वेग कमी होतो आणि चयापचय (metabolism) मंदावतो.
तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.