Pranali Kodre
प्रो कबड्डी स्पर्धाच्या 10 व्या हंगामाचे विजेतेपद पुणेरी पलटणने पटकावलं. 1 मार्च 2024 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुणेरी पलटणने हरियाणा स्टिलर्सला पराभूत करत 10 व्या हंगामाच्या ट्रॉफीवर नाव कोरले.
पुणेरी पलटणचे प्रो कबड्डीमधील हे पहिलेच विजेतेपद आहे. त्यामुळे प्रो कबड्डीला नवा विजेता मिळला आहे.
साल 2014 मध्ये सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद जयपूर पिंक पँथर्सने जिंकले.
प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद यु मुम्बाने जिंकले.
प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामाचे विजेतेपद पटना पायरेट्सने जिंकले.
प्रो कबड्डी लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा विक्रम पटना पायरेट्सने केला. त्यांनी चौथ्या हंगामाचेही विजेतेपद नावावर केले.
प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाचे विजेतेपद पटना पायरेट्सने जिंकून विजेतेपदाची हॅट्रिक साधली.
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद बंगळुरू बुल्सने जिंकले.
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे विजेतेपद बंगाल वॉरियर्सने जिंकले.
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचे विजेतेपद दबंग दिल्लीने मिळवले.
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाचे विजेतेपद जयपूर पिंक पँथर्सने जिंकले.