IPL 2025: 7 चौकार, 9 षटकार! 24 वर्षीय प्रियांशचा धोनीच्या CSK विरुद्ध मोठा कारनामा

Manish Jadhav

आयपीएल 2025

आयपीएल 2025 मध्ये रोज नव-नवे रेकॉर्ड बनत आहेत. यातच मंगळवारी (8 एप्रिल) पंजाबविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 24 वर्षीय प्रियांश आर्यची शतकी खेळी पाहायला मिळाली. पंजाबच्या विजयात त्याची ही खेळी महत्वाची ठरली.

Priyansh Arya | Dainik Gomantak

प्रियांश आर्य

प्रियांशने धोनीच्या चेन्नईविरुद्ध आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. पंजाब किंग्जकडून खेळताना प्रियांशने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Priyansh Arya | Dainik Gomantak

विस्फोटक फलंदाजी

प्रियांश सुरुवातीपासूनच उत्तम लयीत दिसला. एका बाजूकडून विकेट पडत असतानाही, प्रियांशने आपली विस्फोटक फलंदाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, प्रियांशने पुढच्या 20 चेंडूंत आणखी पन्नास धावा जोडल्या. अशाप्रकारे त्याने आयपीएलमधील संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक ठोकले.

Priyansh Arya | Dainik Gomantak

गगनचुंबी षटकार

प्रियांशने 42 चेंडूंचा सामना करत 103 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीदरम्यान 7 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार मारले.

Priyansh Arya | Dainik Gomantak

ट्रॅव्हिस हेडशी बरोबरी

प्रियांशने आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक ठोकले. त्याने या बाबतीत ट्रॅव्हिस हेडची बरोबरी केली. 2024 मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना हेडने 39 चेंडूत शतक झळकावले होते. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने 2013 मध्ये अवघ्या 30 चेंडूत शतक ठोकले होते.

Priyansh Arya | Dainik Gomantak
आणखी बघा